हिंगोली (Badlapur Case) : बदलापूर येथील शाळेत शिकत असलेल्या चार वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या पट्टया बांधून मुकनिदर्शने करण्यात आली. दरम्यान, बदलापूर (Badlapur Case) येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या अत्याराच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात बंदची हाक दिली होती. मात्र उच्य न्यायालयाने बेकायदा ठरवत बंद पुकारण्यास मनाई केली. त्यामूळे न्यायालयाचा आदर करीत हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या फिती लावून तासभर मुक निदर्शने करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अॅड . सचिन नाईक,आ.डॉ. प्रज्ञा सातव, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, प्रकाश थोरात, उबाठाचे जिल्हा प्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटिल, संदेश देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, मनिष आखरे, सुधिर अप्पा सराफ, संजय देशमुख, परमेश्वर मांडगे, नईम शेख शेख लाल, उद्धवराव गायकवाड, वसिम देशमुख, गणेश शिंदे, प्रकाश कावरखे, बापूराव बांगर, भास्कर बेंगाळ, आनंदराव जगताप, विठ्ठल चौतमल,मंगला कांबळे, शेख खलील बेलदार, भानुुदास जाधव, अबेदअली जहागिरदार, आनंदराव जगताप, नैमान, शोभा मोगले, या प्रमुख नेत्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी ,कार्यकर्त्यांची मोठया संख्येने सहभागी झाले होते.
वसमत येथे ही महाविकास आघाडी तर्फे नोंदविला निषेध
वसमत : येथे महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर आणि कोलकत्ता येथील घटनेचा निषेध नोंदवण्यात आला .वसमत येथे निषेध नोंदवण्यासाठी सर्व महाविकास आघाडीतील पक्षांतील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कोलकत्ता आणि (Badlapur Case) बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बांधून कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. आघाडीतील पक्षांतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
औंढा नागनाथ येथे काढला मुकमोर्चा
औंढा नागनाथ : महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी बदलापुर घटनेचा (Badlapur Case) निषेध नोंदविला. शहरातील नगर पंचायत कमानी समोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा केला. महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळा पट्ट्या बांधून मूक मोर्चा काढला .यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जी डी मुळे, तालुकाप्रमुख गणेश देशमुख , काँग्रेसचे माणिकराव पाटील प्रकाश पाठक , सुमेध मुळे, नंदकुमार पाटील, चंद्रमुनी पाईकराव , अलीम खतीब, प्रमोद देशपांडे, बबन माळवटकर ,सुनील खंडागळे, मधुकर गोरे, विष्णू जाधव, बिंदू कुलकर्णी राम काळे अपसर पटेल संतोष रेणके, यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते होते. यावेळी पोलीस निरीक्षक जी एस राहीरे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
सेनगावात निषेधासंदर्भात दिले निवेदन
सेनगाव : येथेही घटनेचा निषेध (Badlapur Case) नोंदवुन निवेदन देण्यात आले. या निवेदनावर संतोष देवकर, उमेश देशमुख, वैभव देशमुख, गजानन पोहकर, जितू देशमुख, पिंटू शिंदे, आर. आर. देशमुख, सचिन शिंदे जीवन, देशमुख, बाबाराव कांगणे, पिंटू गुजर, पांडुरंग देशमुख, विठ्ठल शिंदे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
कळमनुरीत महाविकास आघाडीने केले मुकआंदोलन
कळमनुरी : बदलापूर (Badlapur Case) येथे ३ वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली जावी या करीता महाविकास आघाडीच्या वतीने तहसिल कार्यालय, कळमनुरी येथे तोंडाला काळ्या फिती लावून मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी सोबत आमदार प्रज्ञाताई सातव,माजी आमदार डॉ.संतोष टारफे, शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर ,चंद्रकांत देशमुख ,सखारामजी उबाळे,मारोत राव खांडेकर,डॉ.रमेश मस्के, डॉ. सतिश पाचपुते,कैलास खिल्लारे,भागवत चव्हाण,संतोष सारडा, नागोराव कारंडे,हाफीज भाई ,निहाल कुरेशी,बिलाल कुरेशी,सादिक नाईक,गुलाब भोयर ,सुवर्णाताई गाभणे, शामराव कांबळे,नागोराव खुडे, नामदेव लाखाडे,वनिता गुंजकर,पिंटू जिंतूरकर,कांतराव शिंदे, बबन डुकरे,गणेश जाधव,बाबा भाई, बाळू पारवे,इलियास नाईक,शेख मतीन,अयाज नाईक, एड.रवी शिंदे, अशोक दांडेकर,रामदास मंदाडे, अमोल काळे,कांता पाटील,भगवान शिंदे विठ्ठल माखणे,अख्तर पठाण ,गणेश नीलकंठे,बबलू पठाण, पांडुरंग खुडे ,राम देशमुख, शिवप्रसाद मस्के वेदांत पवार, यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या आंदोलनाला हिंगोलीत भाजप तर्फे ही प्रत्युत्तर
आ. तान्हाजीराव मुटकुळे यांनी बदलापूर येथील नराधमाचा कृत्याचा निषेध नोंदविला व चिमुकलीस न्याय मिळावा, अपराधी नराधमास फाशी देण्याची मागणी केली. बदलापूर येथील ३ वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार या (Badlapur Case) घटनेच्या निषेधार्थ व महाराष्ट्र सरकार कडून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा देऊन पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी करून महाविकास आघाडी तर्फे बदलापूर घटनेप्रकरणी राजकारण केले जात असल्याचा आरोपही भाजप तर्फे करण्यात आला. या वेळी आ.तान्हाजीराव मुटकुळे , माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर ,ज्येष्ठ नेते के.के .शिंदे, शहराध्यक्ष मिलिंद यंबल, शिवाजीराव मुटकुळे, कैलास काबरा, संजय ढोके,बाबा घुगे, शाम खंडेलवाल, उमेश गुठ्ठे, हमीदभाई प्यारेवाले, माणिक लोंढे,सुमंत सवनेकर, आशिष जैस्वाल, राजेश अग्रवाल, कैलास शहाणे, संतोष राव टेकाळे, प्रशांत गोल्डी, घोंगडे ,करण भन्साळी, संदीप वाकडे ,पृथ्वीराज मुटकुळे सोबत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडी व भाजपच्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त
बदलापूर येथील घटनेप्रकरणी (Badlapur Case) सर्व स्तरातून निषेध नोंदविला जात असताना २४ ऑगस्ट रोजी हिंगोलीतील महात्मा गांधी चौकात महाविकास आघाडी तर्फे मुक आंदोलन करण्यात आले. तर महाविर स्तंभ चौकामध्ये भाजप तर्फे बदलापूर प्रकरणात तसेच महाविकास आघाडी तर्पेâ या प्रकरणात करण्यात येणार्या राजकारणावरून निषेध आंदोलन करण्यात आले. हे दोन आंदोलन असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना शहर पोलीसांना दिल्या होत्या. त्यामुळे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी दंगा काबु पथकासह इतर पोलीस कर्मचारी सर्वत्र तैनात केले होते. पोलीसांच्या या बंदोबस्तामुळे जणु काही होणारे आंदोलन हे मोठ्या स्वरुपाचे आहे की, काय असे ही रस्त्यावरून येणार्या जाणार्यांना भासू लागले.