नगरपंचायत व आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष
लाखनी (Lakhani Autopsy Center) : तालुक्यातील शेकडो गांवाच्या नागरिकांकरिता उपयोगी ठरणारे लाखनी येथील (Lakhani Autopsy Center) शवविच्छेदन केंद्र नगरपंचायत व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे घाणीच्या साम्राज्यात भग्नावस्थेत आहे. नागरिकांची गैरसोय होत असल्याने शासन प्रशासना बद्दल असंतोष पसरून रोष व्यक्त केला जात आहे. तेव्हा संबंधित विभागीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ दखल घेऊन समस्या सोडविण्याची माहिती देतांना सर्व स्तरातून मागणी केली जात आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या लाखनी -सालेभाटा मार्गावर मागील अनेक वर्षांपूर्वी तयार केलेल्या (Lakhani Autopsy Center) शवविच्छेदन केंद्रालगत घाणीचे साम्राज्य पसरून भग्नाअवस्था निर्माण झाली असून त्या ठिकाणी पाण्याची, विद्युतची आणी इतर आवश्यक सुविधा उपलब्ध नाही, संपूर्ण लाखनी तालुक्यात आत्महत्या, अपघाती किंवा इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या मृत देहाचे शवविच्छेदन करण्याकरिता लाखनी ग्रामीण रुग्णालयात अंतर्गत ह्याच शवविच्छेदन केंद्राचा उपयोग केला जातो. तालुक्यात कुठेही व्यवस्था नसल्याने भग्नावस्थेत असलेल्या ह्याच शविच्छेदन केंद्रात मृतदेहाची विल्हेवाट लावली जात आहे.
यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. शवविच्छेदन केंद्राची दुर्लक्षित आणि (Lakhani Autopsy Center) भग्नावस्था पाहून नागरिकांत असंतोष निर्माण होऊन, रोष व्यक्त केला जात आहे. तेव्हा जिल्हा आरोग्य अधिकारी, नगरपंचायत प्रशासन तथा लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ दखल घेऊन सदर शवविच्छेदन केंद्र लोकउपयोगी ठरेल अशी व्यवस्था निर्माण करण्याची सर्व स्तरावरून मागणी केली जात आहे.(ता.प्र.)