खमारी/बुटी (Bike Accident) : भंडारा तालुक्यातील पवनी मार्गावर पालगाव येथे दि.१४ जून रोजी रात्री ९.४५ वाजतादरम्यान झालेल्या मोटारसायकल अपघातात मयूर अमरीष कानेकर (२८) रा.पासोरा (दवडीपार) जखमी झाला. मोटारसायकलस्वार मयूर कानेकर हा आपल्या मोटारसायकल क्र. एमएच ३६ ई ७५०७ या गाडीने घटनेच्या दिवशी रात्री ९.४५ वाजतादरम्यान भंडारा येथून पवनी मार्गाने स्वगावाकडे जात असतांना पालगाव येथे विरुद्ध दिशेने येणार्या (Bike Accident) अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात मयूर याच्या डोका व हाताला गंभीर दुखापत होऊन जखमी झाला.
अपघाताची माहिती जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांना माहित होताच त्यांनी (Bike Accident) घटनास्थळ गाठून जखमीला उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचाराकरीता नागपूरला पाठविण्यात आले.