हिंगोली नगरपरिषद

हिंगोली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा २५ ऑगस्टला

Hingoli Municipal Councils: हिंगोली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

हिंगोली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा २५ ऑगस्टला

Hingoli Municipal Councils

 

भटक्या कुत्र्यांपासून जलतरण तलावापर्यंत होणार महत्त्वाचे निर्णय

हिंगोली (Hingoli Municipal Councils) : हिंगोली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सभेसाठी एकूण १६ विषयांचा अजेंडा जाहीर करण्यात आला आहे.

या सभेत शहरातील दैनंदिन समस्या आणि विकासकामांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. उच्च न्यायालयाच्या एल्द... याचिका क्र. ०६/२०२५ च्या आदेशानुसार शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जागेची निश्चिती करण्याचा विषय सर्वात आघाडीवर आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या ऐंश् Rल्त २०१६ नुसार घनकचरा व्यवस्थापनाची कामे अधिक प्रभावीपणे राबवण्याबतही चर्चा होणार आहे.

शहरातील क्रीडा सुविधांमध्ये मोठी भर पडण्याची शक्यता आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या पत्रानुसार प्रभाग क्रमांक २९ मध्ये ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव उभारण्यासाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्याकडे पाठवण्यास सभेत मान्यता मागितली जाणार आहे. नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारा आणखी एक विषय म्हणजे आरक्षण क्रमांक ३३ मधील व्हेजिटेबल मार्केट आणि शॉपिंग सेंटर विकसित करण्याचा प्रस्ताव. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत हिंगोली शहरात मच्छी बाजारासाठी जागा निश्चित करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा विषयही चर्चेला येणार आहे. नगररचना विभागाशी संबंधित दोन महत्त्वाचे विषयही यावेळी मांडले जाणार आहेत. मंजूर विकास योजनेतील नकाशे आता  Aल्ूद-ण्AD वरून थेट उघ्ए प्रणालीत आणण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्याचा प्रस्ताव आहे.

तसेच विविध प्रभागांतील प्रलंबित मालमत्ता पत्रिकांसाठी भूमी अभिलेख विभागामार्फत जमिनीची मोजणी करून घेण्याचा प्रस्तावही सादर होईल. शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी तहसील कार्यालयासमोर पुस्तक आणि पेनची प्रतिकृती उभारण्याचा आणि मुक्या जनावरांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याचा प्रस्तावही सभेत ठेवण्यात आला आहे. प्रशासकीय बाजूने पाहिल्यास २०२५-२६ च्या विकास निधीतील ४ टक्के निधीतून नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत लिफ्ट सुविधा बसवण्याबत, विविध योजनांअंतर्गत आलेल्या निविदांना मान्यता देण्याबाबत आणि मुदत संपलेल्या कामांची देयके अदा करण्याबत निर्णय घेतले जातील. याशिवाय मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे, नवीन कामे प्रस्तावित करणे आणि इतर विषयांवरही चर्चा होणार आहे. नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर यांनी सर्व नगरसेवकांना या सभेला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. शहराच्या पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या सुविधांशी थेट निगडित विषय या सभेत येणार असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
नगरपरिषद नगरपंचायत मधील नगराध्यक्षांना असलेले वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणाचे अधिकार संपुष्टात

नगरपरिषद नगरपंचायत मधील नगराध्यक्षांना असलेले वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणाचे अधिकार संपुष्टात

Hingoli Municipal Council: राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील नमुना क्रमांक ६४ वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी बंधनकारक आहे की नाही याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संभ्रमावर नगर विकास

Sep 04, 2026
हिंगोलीतील मोकाट जनावर,भटक्या कुत्र्यासह आदींचे ठराव पारीत

हिंगोलीतील मोकाट जनावर,भटक्या कुत्र्यासह आदींचे ठराव पारीत

Hingoli Stray Animals: हिंगोली नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केंद्रीय निवारण केंद्र, जनावरांची ठिकाने, भु-नक्शा मोजणी व इतर १६ ठरावांना एकमताने पारित केला.

Aug 25, 2026
हिंगोली नगर पालिकेत पहिल्या महिला परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी स्विकारला पदभार

हिंगोली नगर पालिकेत पहिल्या महिला परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी स्विकारला पदभार

Hingoli Municipal Council: शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला काढलेल्या शासन आदेशात हिंगोली नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदी परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांची नियुक्ती

Aug 10, 2026
जिल्ह्यात रिक्त असलेल्या तीन पैकी हिंगोली न.प. व औंढा ना. नगर पंचायतमध्ये मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती

जिल्ह्यात रिक्त असलेल्या तीन पैकी हिंगोली न.प. व औंढा ना. नगर पंचायतमध्ये मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती

Hingoli Municipal Council: हिंगोली नगर पालिका व औंढा नगर पंचायत मध्ये रिक्त पदावर दोन महिन्यांची प्रतिक्रिया मागण्यात आली. शासनाने मुख्याधिकार्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

Aug 09, 2026