अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात घट!
मानोरा (Cotton Reduction) : मानोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी कापसावर लाल्या रोग आल्याने कापूस उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता दिसत आहे. एका थयलीला दोन ते अडीच क्विंटल उतारा येण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये असल्याने खर्चही वसूल होणार नाही , त्यामुळे भविष्यात संसाराचा गाढा कसा चालवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.
दरानेही मारले शेतकऱ्यांना!
पांढरे सोने पिक समजल्या जाणाऱ्या कापसाची मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी (Farmers) मोठ्या प्रमाणात यंदा लागवड केली आहे. महागाईचे बियाणे, अव्वा ते सव्वा भावात रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करून मोठ्या प्रमाणात कपाशी पिकावर खर्च केलेला आहे. खरीप हंगामात प्रचंड झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे सुरुवातीला पिकांची म्हणावी तशी वाढ झालेली नाही. त्यानंतर एक नव्हे तर तीन वेळा ढगफुटी (Cloudburst) सदृश्य अतिवृष्टी (Heavy Rain) व सततच्या पावसामुळे कापसावर लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला, शेतकऱ्यांनी कापसाची एक येचणी सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन क्विंटलचा उतारा येण्याची शक्यता असल्याने शेतीला लावलेला खर्चही वसूल होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून ऐकावयास येत आहे.
शेतकरी कंगाल तर व्यापारी मालामाल!
अतिवृष्टीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत (Financial Aid) हेक्टरी १८, ५०० कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाली आहे. पण शेतकऱ्यांच्या हातात ८५०० रुपये पहिल्या टप्प्यात येणार असुन उर्वरित दुसरा टप्पा १० हजार रुपये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. परंतु पहिल्या टप्प्याची आर्थिक मदत अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने दिवाळी हा सण गोड होणार की नाही, याची वाट शेतकरी पाहत आहेत. निसर्गाने अवकृपा केली त्यात सरकारही (Government) मदत देण्यास विलंब करत असल्याने शेतकरी हा सणासुदीच्या दिवसात संकटात सापडलेला आहे. त्यामुळे दुष्काळी सवलत व मदत त्वरीत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. आता लाल्या रोगांचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर दिसून येत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
अतिवृष्टीची मदत ३ हेक्टर पर्यंत देण्याचे शासनाने प्रथम परिपत्रक काढले होते. आता पुन्हा शासनाने २ हेक्टरची मर्यादा असल्याचा परिपत्रक काढल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.