रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने लंपास!
परभणी (Burglary) : शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या वैभव नगरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने मिळून मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात २३ ऑगस्टला गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
अज्ञातावर नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल!
राहुल सोळंके यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले रोख १२ हजार रुपये, सोन्याचे मणिमंगळसुत्र, साक्षीदार यांच्या घरातील सोन्याच्या अंगठ्या व इतर दागिने असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सदर प्रकरणी अज्ञात चोरट्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. पवार करत आहेत.
जिंतूर तालुक्यातील सावळी शिवारात चोरी!
जिंतूर : तालुक्यातील सावळी शिवारात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख पाच हजार रुपये तसेच खिडकीमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरुन नेला. ही घटना रविवार २४ ऑगस्टच्या पहाटे घडली. मिरा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. राठोड करत आहेत.




 
			 
		

