परभणी (Kolhapuri dams) : जिल्ह्यात सर्व तालुक्यात गाळाची सुपीक जमीन असून कापूस व इतर पिकांसाठी ही जमीन महत्वाची मानली जाते. मात्र विविध तालुक्यात असलेल्या कोल्हापुरी बंधार्यांना नादुरुस्तीचे ग्रहण लागल्यामुळे संकल्पीत सिंचन क्षेत्रात ५० टक्के पेक्षाही कमी क्षेत्रावर कोल्हापुरी बंधार्यातून सिंचन होत आहे. जिल्ह्यात परभणी तालुक्यात ८, गंगाखेड तालुक्यात ९, पूर्णा तालुक्यात ६, पालम – सोनपेठ प्रत्येकी ४, जिंतूर १७, सेलू ५, मानवत ६ व पाथरी तालुक्यात १ कोल्हापुरी बंधारा (Kolhapuri dams) आहे. तर जिल्हाभरात एकूण ६० कोल्हापुरी बंधारे आहेत. या बंधार्यातून सर्व तालुक्यात मिळून ६ हजार ६७२ घन मिटर पाणी साठवले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक कोल्हापुरी बंधार्यांना दरवाजे नसल्यामुळे, दरवाज्यांची तोडफोड झाल्यामुळे आणि बंधार्याची डागडुजी व दुरुस्तीसाठी निधी अभावी केवळ ३ हजार २६७ घन मिटर पाणी साठविले जाते. परिणामी एकूण संकल्पीत पाणी साठ्यापैकी ५० टक्के पेक्षा कमी पाणी (Kolhapuri dams) कोल्हापुरी बंधार्यांमध्ये अडविले जाते.
कोल्हापुरी बंधार्यात पाणीसाठा उपलब्धतेमुळे परभणी तालुक्यात २३९ हेक्टर, गंगाखेड ८५ हेक्टर, पूर्णा ३७ हेक्टर, पालम ३४ हेक्टर, सोनपेठ २६, जिंतूर १३८, सेलू ५१, मानवत तालुक्यात ७६ हेक्टरवर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. बंधार्यांची पाणी साठविण्याची क्षमता असुनही नादुरुस्ती, दरवाजे नसणे, दरवाजे तुटणे, आणि निधी अभावी बंधार्यात पाणीसाठा होत नसल्याची स्थिती जिल्हाभरात आहे. त्यामुळे (Kolhapuri dams) कोल्हापुरी बंधारा क्षेत्र परिसरातील शेतकर्यांना बंधार्याचा असून खोळंबा, नसून अडचण अशी परिस्थिती उद्भवली आहे. एकूण बंधार्यांपैकी केवळ ४३ बंधार्यांमध्ये दरवाजे बसविले जातात. त्यामध्ये परभणी तालुक्यात ६, गंगाखेड ८, पूर्णा ४, पालम २, सोनपेठ ४, जिंतूर १०, सेलू ४ आणि मानवत तालुक्यातील ५ कोल्हापुरी बंधार्यांना दरवाजे बसविले आहेत.
तर एकूण ६० कोल्हापुरी बंधार्यांसाठी २ हजार ८५७ दरवाज्यांची आवश्यकता आहे. एकूण बंधार्यापैकी डिग्रस, कौडगाव, सेलमोहा, बलसा, ताडकळस, सायाळा, जवळा गुळखंड, बेलखेडा, बोरी, वाघी बोबडे, आसेगाव, आसोला, अंबरवाडी, कुंडी आणि मानोली (Kolhapuri dams) कोल्हापुरी बंधार्यात नादुरुस्ती, निधी अभावी पाणी साठविले जात नाही, अशी स्थिती आहे.
संकल्प सिंचन क्षेत्रापैकी ५० टक्के पेक्षा कमी सिंचन; अनेक बंधार्यांना नाही दरवाजे जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढविण्याची गरज परभणी जिल्ह्याला कापूस व सोयाबीनचे हब म्हणून ओळखले जाते. मात्र या आणि इतर पिकांना संरक्षित पाण्यासाठी झगडावे लागते. त्यामुळे विविध पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. जेणेकरुन शेतकर्यांचे जीवमान उंचाविण्यास मदत होईल.