वसमत (Prahar Jan Shakti Andolan) : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी (Prahar Jan Shakti Andolan) प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navghare) यांच्या आग्रासमोर शुक्रवारी मध्यरात्री आंदोलन करण्यात आलेहातात मशाल घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी (Prahar Jan Shakti Andolan) प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी रात्री आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navghare) यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी हातात मशाल घेऊन घोषणाबाजी केली यात कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वसमत शहर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता घोषणाबाजी केल्यानंतर काही वेळानी आंदोलकांनी मागणीचे निवेदन दिले.