हिंगोली (Electricity supply) : विधानसभा मतदार संघातील सेनगाव व हिंगोली येथील शेतकर्यांना २४ तासातुन एक ते दिड तास सुध्दा विद्युत पुरवठा मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकर्यासह नागरिक मेटाकुटीला आले आहेत. तसेच शेतकर्यांना तात्काळ २४ तास विद्युत पुरवठा (Electricity supply) देण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या हिंगोली येथील कार्यालयासमोर ७ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजता शेतकरी नेते रमेश शिंदे यांच्यासह शेतकरी गुराढोरासह ठिय्या आंदोलन केल्या जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे सेनगाव व हिंगोली तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकर्यांना (Electricity supply) विद्युत पुरवठा २४ तासातून एक ते दिड तास सुध्दा मिळत नाही. शेतकर्यांना तात्काळ १० घंटे विद्युत पुरवठा देण्यात यावा, शेतीतील रोहित्र जळाल्यानंतर ४८ तासात रोहित्र तात्काळ देण्यात यावे, ३३ केव्ही केंद्र नर्सी नामदेव, पांगरी, पुसेगाव, आजेगाव, आडगाव, कनेरगाव नाका, पानकनेरगाव, कवरदरी येथे मागील पाच वर्षापासुन वाढीव ट्रॉन्फार्मरची मागणी करून ही अद्यापपर्यंत ट्रान्सफार्मर देण्यात आले नाही ते देण्यात यावे. ट्रान्सफार्मर मिळत नसल्याने शेती पंपांना विद्युत पुरवठा होत नाही.
त्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ विद्युत पुरवठा (Electricity supply) चालु करून काम करावे. प्रत्येक गावामध्ये मुख्यलाईनला एबीस्वीच बसविण्यात यावे. प्रत्येक ३३ केव्ही अंतर्गत १५ ते २५ गावे जोडलेली असतात. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात आहे. त्यामुळे पुर्ण ३३ केव्ही केंद्र बंद करून सर्व ३० गावांची लाईट पुरवठा २४ तास करण्यात यावा. यासह इतर मागण्यासाठी यापुर्वी आंदोलन केले होते. परंतु विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी खोडा घालत विद्युत पुरवठा सुरळीत न केल्याच्या निषेधार्थ ७ ऑॅक्टोंबर रोजी सोमवारी हिंगोली येथील मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालया समोर दुपारी १ वाजता गुराढोरासह व शेतकर्यासह ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शेतकरी नेते व मराठा सेवक रमेश शिंदे यांनी दिला आहे.