राम डहाके,अंकुश वाघ यांचेसह दिग्गज नेते धृपतराव सावळे हेही प्रबळ दावेदार!
बुलढाणा (Chikhli Assembly Constituency) : जिल्ह्याचे राजकीय राजधानी असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून व्युव्हरचना सुरू केली असून केली असून, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याव्यतिरिक्त नवीन चेहऱ्यासही संधी मिळण्याचे संकेत आहे. त्यात राम डहाके,अंकुश वाघ यांचेसह नुकताच प्रवेश झालेले दिग्गज नेते धृपतराव सावळे हेही प्रबळ दावेदार असू शकतात.
मुंबईतील टिळक भवनात सध्या (Chikhli Assembly Constituency) चिखलीतील काँग्रेस इच्छुकांची तोबा गर्दी आहे. यावेळी चिखली उदयनगर येथील युवा कार्यकर्ते राम डहाके यांनी एक हजार पानांचा वस्तुनिष्ठ कार्यकर्तृत्व अहवाल प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊं पटोले व राष्ट्रीय नेतृत्व खा.मुकुल वासनिकांकडे सादर केला.
गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी, कष्टकरी, माता भगीणी, विद्यार्थी, अंध, अपंग, निराधार तथा सर्वसमावेशक जनसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी सदोदित आंदोलनाच्या माध्यमातून न्याय हक्क मिळवून देणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस नेते राम डहाके यांना चिखली विधानसभा मतदारसंघातुन काँग्रेस पक्षाचा नवीन संघर्षशील आक्रमक आंदोलक तथा निष्ठावान संघटनात्मक चेहरा म्हणून विधानसभेच्या उमेदवारी साठी राम डहाके यांचे नाव आघाडीवर असल्याचे संकेत आहेत.
डहाके यांनी सर्वसामावेशक लोकहितासाठी उभारलेला संघर्षरत लढा, विविध न्यायोचित आक्रमक आंदोलने, व संघटनात्मक कार्य बघता नवीन चेहऱ्यास संधी देण्याच्या विचार नेतृत्वाकडून झाल्यास राम डहाके यांची उमेदवारी प्रदेश काँग्रेस कडून प्रबळ असल्याचे संकेत आहेत. संघटनात्मक कार्य बघता युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष, जिल्हा महासचिव,दोन वेळा पंचायत समितीची उमेदवारी,एकवेळा प.स.सदस्य व सभापती, प्रदेश सचिव, विविध राज्यात निरीक्षक, प्रदेश आंदोलन समिती निरीक्षक, बुलडाणा विधानसभा निरीक्षक असा चढता कार्यकर्तृत्वाचा आलेख राम डहाके यांचा राहिलेला असून दांडगा जनसंपर्क पक्षनिष्ठा व संघटनात्मक कार्याच्या माध्यमातून वरिष्ठ नेतृवांशी असलेले घनिष्ठ संबंध ही त्यांच्या उमेदवारीच्या जमेच्या बाजू आहेत.